-
Jun 24, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
-
Jun 24, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आज (दि.२४) सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांच्या दुजोराने योनहाप वृत्तसंस्थेने दिली आहे. सेऊलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग येथील बॅटरी उत्पादक कंपनी एरिसेलमध्ये सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
विटा : पुढारी वृत्तसेवा : बलवडी येथे १५ दिवसांच्या वयाची १०४ जर्शी गायीची जिवंत आणि मृत दोन खोंडे पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेत असताना विटा पोलिसांनी पकडली. याप्रकरणी मिरज येथील रम जान इसरार मणियार (वय २०), मुशोद्दीन बेपारी (रा.मोमीन गल्ली, शहा डोंगरी मज्जिद जवळ) तसेच बलवडीतील मनोहर पाटील आणि करण तुपे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
मुदाळतिट्टा: शैक्षणिक संस्था मधील मादक द्रव्यांमुळे मानवी जीवनाच्या होणाऱ्या शोषणाबाबत जागरूकता आणण्यासाठी शाळांमधून प्रहारी क्लबची (Prahari Group) निर्मिती करण्यात येणार आहे. या क्लबना मादक द्रव्यांच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील, अशा मुलांवर लक्ष ठेवणे. शैक्षणिक संस्थेच्या परिसरातील मादक द्रव्य तस्करीस आळा घालण्याची जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करता येणार आहे.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज (दि.२३) मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना या मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह शनिवारी (दि. २२) जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल्यांच्या पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला ‘भगोडा’ म्हटले असून, त्याला जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा: मागील २५ वर्षे जनतेने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपले. लोकसेवेसाठी पुन्हा एकदा मला आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली. तुम्ही जे- जे काम हातामध्ये सोपविले, ते- ते प्रामाणिकपणे तडीस नेण्याचा मी प्रयत्न केला. तुमच्या आशीर्वाद आणि भरभक्कम पाठबळामुळेच जिल्ह्याचे नेतृत्व सिद्ध करू शकलो, असे प्रतिपादन पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यमगे (ता.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : शिरढोण (ता.शिरोळ) येथे गुलमोहर हॉटेलजवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.२३) सकाळी ११ च्या सुमारास झाला. सलिम समशेर इचलकरंजे (वय ४९, रा. आलास, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर साहेरा सलीम इचलकरंजे, फारूक कादर शेख (रा. इचलकरंजी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुस्लीम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार समाजाच्याही कुणबी नोंदी निघाल्या आहेत. मग मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे. त्यांच्यावरही अन्याय व्हायला नको. आता जे कायद्याने बोलायचे ते कायद्याने बोला. अशी मागणी राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल असा इशारा त्यांनी दिला.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Avinash Sutar
वाशिम: पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 175 जवळ कारचा टायर फुटून दोन महिला जखमी झाल्या. ही अपघात आज (दि.23) दुपारी दीडच्या सुमारास झाला. जखमी महिलांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. शरयू नागरे (वय 28), मेघाताई नागरे (वय 48) असे जखमी महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री संत गजानन महाराज शेगाव येथून दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कारचा (एम एच 31 एफ इ 98 20) समृद्धी महामार्ग लोकेशन 175 वर टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला.