
Articles
-
Jun 24, 2024 |
pudhari.news | Ganesh Sonawane
नाशिक : पुढारी ऑनलाइन – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान (दि. 26) जून होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
-
Jun 24, 2024 |
pudhari.news | Ganesh Sonawane
पिंपळनेर (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा : दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकुर लिहलेले पत्रक छापून नाशिकच्या पंचवटी परिसरात या पत्रांचे वाटप करण्यात आले. या घटनेनंतर नाशिकमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद नाशिकबाहेरही उमटले आहेत. या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यामागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे रास्तारोको करण्यात आला. दलित समाज बांधवांनी आज (दि. 24) सकाळी 11 वाजता तब्बल एक तास बस थांब्यावर रास्तारोको करीत घटनेचा निषेध केला.
Nashik News | वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न…,संजय राऊतांच्या वक्तव्यावर दादा भुसे भडकले | पुढारी
Jun 20, 2024 |
pudhari.news | Ganesh Sonawane
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केले आहे. भुसे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची कीव करावी वाटते, वारकऱ्यांबद्दल असे बोलणे चुकीचे आहे, असे म्हणत भुसे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
-
Jun 20, 2024 |
pudhari.news | Ganesh Sonawane
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडले आहे. रविवार कारंजा येथून दोघांना ३२ ग्रॅम एमडीसह पकडले. धीरज धनराज चांदनानी (२४, रा. एम. जी. रोड), रोहित सुनील अहिरराव (२७, रा. शांतीनगर, मखमलाबाद शिवार) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. विशेष पथकातील पोलिस हवालदार देवकिसन गायकर, अंमलदार चंद्रकांत बागडे यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१९) ही कारवाई करण्यात आली.
-
Jun 20, 2024 |
pudhari.news | Ganesh Sonawane
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सनई चौघडे, टाळ मृदुंग अन् विठू नामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, ‘एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..’ हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या प्रयागतीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे पालखीची पहिला मुक्काम पडला.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →