
Articles
-
4 days ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
Crime News: सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रन्सफर करण्यात येतात. मात्र, लाच कधी ऑनलाईन घेतली जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळणार आहे. परंतु पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केला आहे. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला. छत्रपती संभाजीनगरमधील सहायक फौजदारास अटक करण्यात आली आहे. बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी वाहतुकीसाठी एका 30 वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली.
-
4 days ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
IPL 2025 New Schedule: भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 स्थगित करण्यात आली होती. परंतु आता दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा निर्णय झाला. त्यामुळे आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे. सामन्याची नवीन तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. आयपीएलचे अजून १६ सामने राहिले आहेत.
-
4 days ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
ISRO satellite: भारत ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत चीनचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. अवकाशातून भारताची देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग सॅटेलाइटला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.59 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. भारताचा देखरेख ठेवणारा उपग्रह अधिक चांगली माहिती देणार आहे.
-
4 days ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संकटामुळे भर पडली आहे. आता शेतकऱ्यांचा कांदा हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. आता नाफेडकडून सुरु होणाऱ्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले असून शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
-
4 days ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून घामाघामू झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून दाखल होत आहे. तसेच यंदा पाऊस चांगला बरसणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी २७ मे रोजी केरळामध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून १ जून दाखल होत असतो. परंतु आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून २३ मे ते ३१ मेदरम्यान कधीही येऊ शकतो.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →