TV 9 Marathi
TV9 Marathi is a round-the-clock news channel that broadcasts in Marathi from Mumbai, Maharashtra. Established in 2009, it operates under the belief that ABCL stands for building a better society. This vision resonates deeply within individuals but gains significance only through strong expression. We are committed to delivering fair, balanced, and trustworthy news in an innovative and engaging way. By encouraging open discussions on various viewpoints, we aim to empower people to make informed decisions. The interests of citizens are our top priority, and we strive to voice them effectively. Our role as a watchdog is performed with dedication, and we actively seek solutions to the issues we uncover. During challenging times for citizens, we believe it is the responsibility of journalists to go above and beyond to help provide assistance and resolution.
Outlet metrics
Global
#4673
India
#358
News and Media
#50
Articles
-
1 week ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला शरणागती पत्करण्यास लावतील, अशी अपेक्षा सर्व जग व्यक्त करत होते. परंतु चीन अमेरिकेपुढे झुकला नाही. मात्र, चीनला नमवण्याचे काम भारताने करुन दाखवले आहे. अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉरचा फायदा भारताने उचलला आहे. भारताच्या सर्व अटी चीनने मान्य केल्या आहेत. चीनी कंपन्या भारताच्या अटींवर देशात गुंतवणूक करण्यास तयार झाल्या आहेत. दीर्घ काळापासून चीन या अटी मान्य करत नव्हता. शंघाई हायली ग्रुप आणि हायर यासारख्या कंपन्याही भारताच्या अटींवर गुंतवणूक करण्यास तयार झाल्या आहेत.
-
1 week ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतीकारी ठरणारा मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो ७ अ या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला. या प्रकल्पाची पाहणी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते विमानतळ मार्गाचे एकत्रिकरण करण्याचा हा नवीन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. खूप अवघड परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
-
1 week ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
Raigad waghya dog statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला नाही. तो काही काळ स्थगित केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर होते. त्यामुळे हा विषय काही काळ थांबवला होता. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात वाघा कुत्र्याचा विषय एक दंतकथा आहे. या दंतकथेतून निर्माण झालेले पात्र शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी नको, असे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.
-
1 week ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
महाराष्ट्रातही पहिलीपासून मराठी-इंग्रजीसोबत हिंदी विद्यार्थ्यांना शिकावी लागणार आहे. शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात तामीळनाडू, केरळ आदी दक्षिण भारतातील राज्यांकडून विरोध सुरु आहे. आता महाराष्ट्रातून हिंदी सक्तीला विरोध होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी सक्तीला विरोध करण्यात आला आहे. राज्यात सीबीएससी बोर्ड पॅटर्न लागू होत आहे.
-
1 week ago |
tv9marathi.com | Jitendra Zavar
बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबा गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रम गुरुवारी होत आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी महंत नामदेव शास्त्री पुढाकार घेणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचे विधान केले.
TV 9 Marathi journalists
Contact details
Address
123 Example Street
City, Country 12345
Website
http://tv9marathi.comTry JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →