Articles

  • 2 months ago | ruralindiaonline.org | kavitha Muralidharan |P. Sainath |Medha Kale

    “बजेट बजेटजयघोष सुरू आहे, पण आमच्या आयुष्यात काही तरी फरक पडणारे का?” के. नागम्मा म्हणतात. नागम्मांचे पती २००७ साली सेप्टिक टँक साफ करत असताना मरण पावले. तेव्हापासून दोनमुलींचा सांभाळ नागम्मांनी एकटीनेच केला आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर नागम्मासपाई कर्मचारी आंदोलनाच्या संपर्कात आल्या आणि आता त्या संघटनेच्या निमंत्रक आहेत. त्यांची थोरली मुलगी, शैला नर्स आहे आणि धाकटी आनंदी सध्या एक तात्पुरती सरकारीनोकरी करतीये. “बजेट हा आमच्यासाठी फक्त एक भारीशब्द आहे.

  • 2 months ago | ruralindiaonline.org | Amir Malik |Swadesha Sharma |Medha Kale

    कोविड-१९ च्या महामारीच्या काळातहरयाणाहून सगळा पसारा आवरून आपल्या गावी, उत्तर प्रदेशातल्या महाराजगंजला पोचण्यासाठीकाय कसरत करावी लागली होती हे सुनीता निषाद आजही विसरलेली नाही. कसलीही पूर्वसूचना न देता देशभरातटाळेबंदी लावण्यात आली आणि तिच्यासारख्या लाखो स्थलांतरित कामगारांवर संकटांचाडोंगर कोसळला. त्यामुळे बजेटमधल्या किंवा इतरही कोणत्या सरकारी योजनांबद्दल तिलाकसलाही रस नाही यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. “तुम्ही मला बजेटबद्दल विचारताय?” तीमला विचारते.

  • 2 months ago | ruralindiaonline.org | Umesh Kumar Ray |Medha Kale

    अंजना देवींचं असं म्हणणं आहे की बजेटवगैरे सगळं गड्यांचं काम आहे. “मरद लोग ही जानता है ए सब, लेकिन वोतो नही है घर पर,” त्या म्हणतात. खरं तर घराचं सगळं बजेट त्याच पाहतात, बरं. अंजनादेवी चमार या अनुसूचित जातीच्या आहेत. “बज्जट...” याबद्दल आपण काही ऐकलंयका हे आठवण्याचा त्या प्रयत्न करतात.

  • Jan 5, 2025 | ruralindiaonline.org | Pratishtha Pandya |P. Sainath |Medha Kale

    “मला नाही वाटत मी एक चित्रकार आहे. एखाद्या चित्रकारात असणारे गुण माझ्यात नाहीत. पण माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टीआहेत. माझ्या कुंचल्याच्या मदतीने याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्याकुंचल्याच्या रेषा किंवा फटकारे अगदी अचूक आहेत असं काही माझं म्हणणं नाहीये. खरंसांगायचं तर मी फक्त गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या चित्रकारांचं कामसमजून घेण्याचा आणि अभ्यासण्याचा प्रयत्न करतीये. नाही तर मला यातलं काहीही माहीतनव्हतं. मी फक्त गोष्ट सांगण्यासाठी चित्र काढत होते.

  • Jan 4, 2025 | ruralindiaonline.org | Umesh Kumar Ray |Medha Kale

    सागाच्या एका मजबूत फांदीला वेटोळंघालून नागोबा बसलेला होता. रत्ती टोला गावातल्या लोकांनी त्याला हुसकण्याचा भरपूरप्रयत्न केला पण तो काही हलेना. पाच तास प्रयत्नांची शर्थ केल्यानंतरगावकऱ्यांनी मुंद्रिका यादव यांना बोलावलं. ते जवळच्याच वाल्मिकी व्याघ्रप्रकल्पात वनरक्षक म्हणून काम करायचे. त्यांनी आजवर वाघ, बिबट्या, गेंडा आणिसापासारख्या २०० पशुप्राण्यांची सुटका केली आहे. मुंद्रिका आले आणि त्यांनी आधी तो नागोबाझाडावरून खाली यावा यासाठी प्रयत्न सुरू केले.

Contact details

Socials & Sites

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →